| रेल्वेचा डबा रुळावरुन घसरला | by TrustMe on 23 July, 2013 - 08:59 PM | ||
|---|---|---|
TrustMe | रेल्वेचा डबा रुळावरुन घसरला | on 23 July, 2013 - 08:59 PM | |
मुंबई – कर्जतहून बदलापूरकडे जाणा-या रेल्वेचा डबा रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास रुळावरुन घसरला. मेगाब्लॉक असल्यामुळे रेल्वेच्या कर्मचा-यांनी युद्धपातळीवर कामकरुन सायंकाळी साडेसहा वाजता मार्गावरील वाहतूक सुरु केली. कर्जत-बदलापूर लोकल बदलापूरच्या फलाट क्रमांक दोनमध्ये शिरत असताना रेल्वेचा डबा रुळावरुन घसरला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. | ||