| रूळ पाण्यात गेल्याने प्रवाशांची तारांबळ by irmafia on 21 July, 2013 - 12:01 PM | ||
|---|---|---|
irmafia | रूळ पाण्यात गेल्याने प्रवाशांची तारांबळ on 21 July, 2013 - 12:01 PM | |
मुंबई - शुक्रवारी पावसाने उपनगरीय रेल्वेची चांगलीच परीक्षा घेतली. त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले. अनेकांना रेल्वे रुळावरून भर पावसात पायपीट करावी लागली, तर अनेक जण स्थानकातच तासन् तास लोकलची वाट पाहात होते. त्यात इंडिकेटर्स आणि उद्घोषणाही बंद होत्या. रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यांवर आणि परिसरात पाणी साचल्याने पुढे जाण्याचा मार्गही उरला नव्हता. त्यामुळे अनेकांनी कार्यालयात जाण्याऐवजी मिळेल त्या वाहनाने घर गाठणेच पसंत केले. | ||