| दरभंगा- बंगलोर आता म्हैसूरपर्यंत by riteshexpert on 01 August, 2013 - 11:59 PM | ||
|---|---|---|
riteshexpert | दरभंगा- बंगलोर आता म्हैसूरपर्यंत on 01 August, 2013 - 11:59 PM | |
१२५७७ - १२५७८ दरभंगा - बंगलोर ही साप्ताहिक गाडी तात्काल प्रभावापासून म्हैसूरपर्यंत वाढविण्यात आली आहे . ही गाडी आधी बंगलोरपर्यंतच जायची . आता ती केनगिरी , मंड्या मार्गे म्हैसूरला जाणार आहे . १२५७७ दरभंगा - म्हैसूर बागमती एक्सप्रेस - ही गाडी दर मंगळवारी १६ . १० वाजता दरभंगावरून निघेल व गुरुवारी २३ . ३५ वाजता म्हैसूरला पोहचेल . नागपूर मंडळातील स्थानकांवर या गाडीच्या येण्याच्या व जाण्याच्या वेळा - बैतुल ( १५ . ०१ , १५ . ०२ ), पांढुर्णा ( १६ . २२ , १६ . २३ ), नागपूर ( १८ . २० , १८ . ४५ ), सेवाग्राम ( १९ . ५७ , १९ . ५८ ), चंद्रपूर ( २१ . ४९ , २१ . ५० ), बल्लारशाह ( २२ . ४० , २२ . ५० ). | ||