Indian Railways News => Topic started by riteshexpert on Aug 01, 2013 - 23:59:57 PM


Title - दरभंगा- बंगलोर आता म्हैसूरपर्यंत
Posted by : riteshexpert on Aug 01, 2013 - 23:59:57 PM

१२५७७ - १२५७८ दरभंगा - बंगलोर ही साप्ताहिक गाडी तात्काल प्रभावापासून म्हैसूरपर्यंत वाढविण्यात आली आहे . ही गाडी आधी बंगलोरपर्यंतच जायची . आता ती केनगिरी , मंड्या मार्गे म्हैसूरला जाणार आहे . १२५७७ दरभंगा - म्हैसूर बागमती एक्सप्रेस - ही गाडी दर मंगळवारी १६ . १० वाजता दरभंगावरून निघेल व गुरुवारी २३ . ३५ वाजता म्हैसूरला पोहचेल . नागपूर मंडळातील स्थानकांवर या गाडीच्या येण्याच्या व जाण्याच्या वेळा - बैतुल ( १५ . ०१ , १५ . ०२ ), पांढुर्णा ( १६ . २२ , १६ . २३ ), नागपूर ( १८ . २० , १८ . ४५ ), सेवाग्राम ( १९ . ५७ , १९ . ५८ ), चंद्रपूर ( २१ . ४९ , २१ . ५० ), बल्लारशाह ( २२ . ४० , २२ . ५० ).
१२५७८ म्हैसूर - दरभंगा बागमती एक्सप्रेस - ही गाडी म्हैसूरवरून दर शनिवारी ७ . २० वाजता निघेल व सोमवारी १४ . ४५ वाजता दरभंगा येथे पोहचेल . नागपूर मंडळातील स्थानकांवर या गाडीच्या येण्याच्या व जाण्याच्या वेळा - बल्लारशाह ( ६ . ०० , ६ . १० ), चंद्रपूर ( ६ . २६ , ६ . २९ ), सेवाग्राम ( ८ . १४ , ८ . १६ ), नागपूर ( १० . २० , १० . ३० ).