| गैरसोय: रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाने प्रवाशांची उडवली झोप by railenquiry on 03 July, 2013 - 03:08 AM | ||
|---|---|---|
railenquiry | गैरसोय: रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाने प्रवाशांची उडवली झोप on 03 July, 2013 - 03:08 AM | |
औरंगाबाद- दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने नगरसोल- नांदेड (57541) या चाकरमान्यांसाठी सोयीच्या असलेल्या पॅसेंजर रेल्वेची वेळ बदलल्याने औरंगाबादहून जालना आणि परभणीकडे जाणार्या चार हजारांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. सकाळी नऊ वाजता औरंगाबादहून निघणारी रेल्वेगाडी आता 7.15 वाजता निघेल. नवीन वेळापत्रक सर्वांसाठी गैरसोयीचे व त्रासदायक असल्याने प्रवाशांनी विरोध दर्शवला आहे. | ||