| गावांतूनही रेल्वे रिझर्व्हेशन by Mafia on 12 September, 2013 - 11:57 AM | ||
|---|---|---|
Mafia | गावांतूनही रेल्वे रिझर्व्हेशन on 12 September, 2013 - 11:57 AM | |
कोल्हापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आता संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) कक्षाच्या मदतीने रेल्वे आरक्षण करणे शक्य होणार आहे. जिल्हा परिषदेने रेल्वे विभागाला याबाबत प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. इंटरनेट उपलब्ध असलेल्या ठिकाणी रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यांतील ८१ ठिकाणी ही सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. | ||