Indian Railways News => Topic started by Mafia on Sep 12, 2013 - 11:57:05 AM


Title - गावांतूनही रेल्वे रिझर्व्हेशन
Posted by : Mafia on Sep 12, 2013 - 11:57:05 AM

कोल्हापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आता संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) कक्षाच्या मदतीने रेल्वे आरक्षण करणे शक्य होणार आहे. जिल्हा परिषदेने रेल्वे विभागाला याबाबत प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. इंटरनेट उपलब्ध असलेल्या ठिकाणी रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यांतील ८१ ठिकाणी ही सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेची ही केंद्रे प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या नियमांची औपचारिता पूर्ण करावी लागणार आहे. सध्या या कक्षाच्या माध्यमातून १२ वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले जातात. त्यात डोम‌िसाईल , उत्पन्न दाखला आणि सातबारा उताऱ्याचा समावेश आहे. रेल्वे बुकिंगची व्यवस्था झाल्यामुळे या कक्षातील सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेता येणार आहे.
सध्या जिल्हा परिषदेला रिझर्व्हेशन सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर जिल्हा परिषद राज्य एसटी महामंडळाशीही संपर्क साधून बस रिझर्व्हेशन सुविधाही सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.