Now IR will establish Malls by railenquiry on 02 October, 2013 - 02:59 AM | ||
---|---|---|
railenquiry | Now IR will establish Malls on 02 October, 2013 - 02:59 AM | |
मिरज - रेल्वे महाराष्ट्रात विविध ठिकाणी 14 मॉल उभारणार असून, त्यासाठी पडीक जागांचा वापर केला जाणार आहे. सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज मॉलमुळे रेल्वेच्या स्थानकाबाहेरील बकाल परिसरांचा कायापालट होणार आहे. याबाबत निविदाप्रक्रिया दिल्लीत सुरू आहे. काही महिन्यांत कामेही सुरू होणार आहेत. पहिल्या टप्प्यात सोलापूर, शेगाव, बुलडाणा, मनमाड, मुंबई व मिरज या ठिकाणी मॉल सुरू होतील; तर दुसऱ्या टप्प्यात मुंबईत दोन, भुसावळमध्ये तीन आणि पुणे, सोलापूर, नांदेड, नागपूर येथे प्रत्येकी एका जागेचा विकास मॉलच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे. सर्व ठिकाणची निविदाप्रक्रिया सुरू आहे. पहिल्या निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. |