Indian Railways News => Topic started by railenquiry on Oct 02, 2013 - 02:59:30 AM


Title - Now IR will establish Malls
Posted by : railenquiry on Oct 02, 2013 - 02:59:30 AM

मिरज - रेल्वे महाराष्ट्रात विविध ठिकाणी 14 मॉल उभारणार असून, त्यासाठी पडीक जागांचा वापर केला जाणार आहे. सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज मॉलमुळे रेल्वेच्या स्थानकाबाहेरील बकाल परिसरांचा कायापालट होणार आहे. याबाबत निविदाप्रक्रिया दिल्लीत सुरू आहे. काही महिन्यांत कामेही सुरू होणार आहेत. पहिल्या टप्प्यात सोलापूर, शेगाव, बुलडाणा, मनमाड, मुंबई व मिरज या ठिकाणी मॉल सुरू होतील; तर दुसऱ्या टप्प्यात मुंबईत दोन, भुसावळमध्ये तीन आणि पुणे, सोलापूर, नांदेड, नागपूर येथे प्रत्येकी एका जागेचा विकास मॉलच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे. सर्व ठिकाणची निविदाप्रक्रिया सुरू आहे. पहिल्या निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा मॉल मिरजेत असेल. तो तब्बल 76 हजार 665 चौरस फूट जागेवर असेल. पंढरपूर लोहमार्गाचे रुंदीकरण झाल्यामुळे जुन्या रेल्वे स्थानकाची जागा सध्या वापराविना पडून आहे. रेल्वेकडे पडीक जागांच्या व्यावसायिक वापराचे धोरण तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आणले. वेगळी आस्थापनाही तयार केली. याच आस्थापनेकडून निविदाप्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात समावेश केलेल्या जागांची विकासासाठी निवड केली त्याच्या प्रमुख कारणांत वाढता उद्योग, व्यवसाय, शहराची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी, रेल्वेचे वाढते दळणवळण यांचा विचार केला आहे. मिरजेच्या बाबतीत वैद्यकीय व्यवसाय हे एक जादा कारण आहे.

मॉलमध्ये हे असेल
एसी-नॉन एसी लॉजिंग
सुसज्ज विश्रांतिगृह
कम्युनिटी सेंटर, रेस्टॉरंट,
रिटेल शॉप्स, भोजनालय
बॅंक आणि एटीएम
दवाखाना
इंटरनेट कॅफे,
पर्यटन माहिती केंद्र
प्रीपेड टॅक्‍सी कार रेंटल सेंटर
महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे माहिती केंद्र