| delhi railway board not cooperating central railway over actodc system | Loksatta by AllIsWell on 25 January, 2013 - 03:00 PM | ||
|---|---|---|
AllIsWell | delhi railway board not cooperating central railway over actodc system | Loksatta on 25 January, 2013 - 03:00 PM | |
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण या मार्गावर एसी विद्युत प्रणालीचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर २६ जानेवारीपासून एसी व डीसी अशा दोन्ही प्रणाली असलेल्या ७-८ गाडय़ा आणण्याची घोषणा मरेच्या महाव्यवस्थापकांनी केली होती. परंतु दिल्लीतील रेल्वे बोर्डाच्या हटवादी भूमिकेमुळे महाव्यवस्थापकांचे आश्वासन अंमलात येण्यास खीळ बसली आहे. रेल्वे बोर्डाच्या मध्य रेल्वेशी असलेल्या दुजाभावामुळेच या गाडय़ा येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार या संपूर्ण उपनगरी पट्टय़ात एसी विद्युत प्रणाली सुरू झाली आहे. त्यामुळे प. रेल्वेवर एसी व डीसी अशा दोन्ही प्रणालींवर चालणाऱ्या गाडय़ांची आवश्यकता उरलेली नाही. | ||