| नांदेड-पुणे रेल्वेच्या चार फेऱ्या by Mafia on 31 May, 2013 - 06:00 PM | ||
|---|---|---|
Mafia | नांदेड-पुणे रेल्वेच्या चार फेऱ्या on 31 May, 2013 - 06:00 PM | |
औरंगाबाद : दक्षिण - मध्य रेल्वेने नांदेड - पुणे अशी चार सेवा देणारी विशेष रेल्वेसेवा जाहीर केली आहे . यातील दोन फेऱ्या मनमाडमार्गे , तर दोन फेऱ्या परळीमार्गे सुरू करण्यात येणार आहेत . नांदेड ते पुणे अशी रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवाशी संघटनेच्या वतीने करण्यात येत होती . त्यामुळे आता जालना , परभणी , सेलू , मानवत रोड आणि नांदेड भागातील प्रवाशांची सोय होणार आहे . नांदेड - पुणे परळीमार्गे जाणाऱ्या गाड्या १२ आणि २१ जूनला जाणार आहेत . या गाड्यात्याच दिवशी दहा वाजता परतीचा प्रवास सुरू करणार आहे . मनमाडमार्गे जाणाऱ्या गाड्या ५ आणि १९ जूनला सुटणार आहेत . या चारही गाड्या दहा तासांमध्ये प्रवास पूर्ण करणार आहेत . | ||