Indian Railways News => Topic started by Mafia on May 31, 2013 - 18:00:58 PM


Title - नांदेड-पुणे रेल्वेच्या चार फेऱ्या
Posted by : Mafia on May 31, 2013 - 18:00:58 PM

औरंगाबाद : दक्षिण - मध्य रेल्वेने नांदेड - पुणे अशी चार सेवा देणारी विशेष रेल्वेसेवा जाहीर केली आहे . यातील दोन फेऱ्या मनमाडमार्गे , तर दोन फेऱ्या परळीमार्गे सुरू करण्यात येणार आहेत . नांदेड ते पुणे अशी रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवाशी संघटनेच्या वतीने करण्यात येत होती . त्यामुळे आता जालना , परभणी , सेलू , मानवत रोड आणि नांदेड भागातील प्रवाशांची सोय होणार आहे . नांदेड - पुणे परळीमार्गे जाणाऱ्या गाड्या १२ आणि २१ जूनला जाणार आहेत . या गाड्यात्याच दिवशी दहा वाजता परतीचा प्रवास सुरू करणार आहे . मनमाडमार्गे जाणाऱ्या गाड्या ५ आणि १९ जूनला सुटणार आहेत . या चारही गाड्या दहा तासांमध्ये प्रवास पूर्ण करणार आहेत .