| मेट्रोबरोबरच मोनोही मार्गस्थ by Mafia on 12 January, 2013 - 12:00 PM | ||
|---|---|---|
Mafia | मेट्रोबरोबरच मोनोही मार्गस्थ on 12 January, 2013 - 12:00 PM | |
पुणे - पुण्यातील अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याच्या म्हणजेच हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूटच्या सर्वेक्षणाचे काम महापालिकेने गेल्याच आठवड्यात मोनार्क कंपनीकडे सोपविले असून त्यानंतर मोनोरेल धावणार असलेल्या या प्रकल्पाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. तसेच शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यान लाइट रेल्वे आखण्यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम जपानी कंपनीने सुरूही केले आहे. त्यामुळे मेट्रो, मोनोरेल आणि लाइट रेल्वे या तीनही प्रकारांमधील घडामोडी एकाच वेळी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. | ||