| वेटिंग तिकिटावर रेल्वे प्रवास अशक्य by eabhi200k on 23 July, 2013 - 11:59 PM | ||
|---|---|---|
eabhi200k | वेटिंग तिकिटावर रेल्वे प्रवास अशक्य on 23 July, 2013 - 11:59 PM | |
रेल्वे रिझर्व्हेशनच्या भल्यामोठया रांगेत उभे राहून वेटिंग तिकीट मिळाले तरी तुम्हाला रेल्वेनं प्रवास करता येईलच, असे आता सांगता येणार नाही. कारण नवी दिल्ली / रत्नागिरी- रेल्वे रिझर्व्हेशनच्या भल्यामोठया रांगेत उभे राहून वेटिंग तिकीट मिळाले तरी तुम्हाला रेल्वेनं प्रवास करता येईलच, असे आता सांगता येणार नाही. कारण रेल्वे प्रशासनाने आता वेटिंग संदर्भातील नियम बदलले आहेत. याचा फटका प्रतीक्षा यादीवरील तिकिटावर निदान उभ्यानं तरी प्रवास करता येईल, अशा आशेवर राहणा-या प्रवाशांना बसणार आहे. लांब पल्ल्यांच्या गाडयांमध्ये अनेकदा रिझव्र्हेशन कन्फर्म (निश्चित) झाले नाही तरी वेटिंगवर उभे राहून जाऊ, असे म्हणून अनेक प्रवासी रिझव्र्हेशनच्या डब्यातून किंवा जनरल डब्यातून आतापर्यंत प्रवास करायचे. रेल्वेच्या डब्यांमध्ये यामुळे प्रचंड गर्दी व्हायची. रेल्वेच्या निर्णयामुळे अशा गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. याआधी फक्त इंटरनेटवरून वेटिंग तिकीट मिळाले असल्यास प्रवाशाला त्या गाडीतून प्रवास करता येत नव्हता. आता मात्र रेल्वेच्या रिझव्र्हेशन काउंटरवरून वेटिंग तिकीट घेतले असले तरी तुम्हाला त्या गाडीतून प्रवास करता येणार नाही. असा प्रवास कुणी करत असल्यास गाडीतील टीटीई (ट्रॅव्हलिंग टिकेट एक्झामिनर) त्या व्यक्तीस गाडीतून खाली उतरवू शकतात, तसेच त्या व्यक्तीला दंडही भरावा लागू शकतो, असे रेल्वे प्रशासनाकडून बदलण्यात आलेल्या नियमांमध्ये म्हटले आहे. या निर्णयांची अमलबजावणी रेल्वे प्रशासनाकडून तातडीने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे वेटिंग तिकीट असेल अशा प्रवाशांनी आधी टीटीईकडे जागा आहे की नाही, याची विचारणा करणे आवश्यक आहे. टीटीईने जागा असल्याचे सांगितल्यासच त्या प्रवाशाला वेटिंग तिकिटावर प्रवास करणे शक्य आहे. अन्यथा त्या व्यक्तीला प्रवास करता येणार नाही. नेहमी रिझव्र्हेशनने प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे गाडयांमधील गर्दी कमी होऊन पर्यायाने प्रवास करताना होणारा त्रास कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र अनेकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या निर्णयामुळे रेल्वेला देखील तोटाच अधिक होईल, असे जाणकारांचे मत आहे. | ||