| रेल्वेने उत्तराखंडातून महाराष्ट्रातील २४० यात्रेकरू परतले by railgenie on 27 June, 2013 - 09:30 AM | ||
|---|---|---|
railgenie | रेल्वेने उत्तराखंडातून महाराष्ट्रातील २४० यात्रेकरू परतले on 27 June, 2013 - 09:30 AM | |
उत्तराखंड येथे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या राज्यातील २४० प्रवाशांना नवी दिल्ली येथून शनिवारी रेल्वेने महाराष्ट्रात पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत २१५० यात्रेकरू व पर्यटकांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या सचिव व संचालक आय.ए. कुंदन यांनी दिली. भाविकांना सुखरूप पोचविण्यासाठी आणखी ५० लाख रुपये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले असून भाविकांच्या सुखरूप बाहेर काढण्यासाठी दोन हेलिकॉप्टरही रवाना केली आहेत. | ||