| रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वार्यावर.. by eabhi200k on 23 July, 2013 - 08:59 PM | ||
|---|---|---|
eabhi200k | रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वार्यावर.. on 23 July, 2013 - 08:59 PM | |
सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकावर अगोदरच हाणामारी, चोर्या, जनरल डब्यात बसण्यावरून एका महिलेचा जीव जाणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असतानाच आता महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोलापूर रेल्वे स्थानकात देखील खबरदारी घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता शासनाच्या सुरक्षा यंत्रणेसमोरील आव्हान आणखी वाढले आहे. | ||