| मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेला रेड सिग्नल, वसईपुढे वाहतूक ठप्प by railenquiry on 18 July, 2013 - 09:00 AM | ||
|---|---|---|
railenquiry | मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेला रेड सिग्नल, वसईपुढे वाहतूक ठप्प on 18 July, 2013 - 09:00 AM | |
मुंबई- गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेला मोठा फटका बसला आहे. वसई रोड ते वलसाड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी असल्यामुळे पश्चिम रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच उपनगरीय रेल्वे गाड्या केवळ वसई रोडपर्यंतच धावणार आहेत. आटुल आणि पारडी रेल्वे स्थानकांदरम्यान पुलांवरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे पाणी ओसरेपर्यंत अहमदाबाद येथून मुंबईकडे येणा-या काही गाड्या सुरतपासूनच मागे वळण्यात आल्या आहेत. तर दिल्लीकडून येणा-या लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. वलसाड ते सुरत स्थानकांदरम्यानही वाहतूक थांबविण्यात आली आहे. | ||