| मुंबापुरी झाली तुंबापुरी ,रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला by Mafia on 23 July, 2013 - 07:59 PM | ||
|---|---|---|
Mafia | मुंबापुरी झाली तुंबापुरी ,रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला on 23 July, 2013 - 07:59 PM | |
मुंबई व परिसराला मंगळवारी पहाटेपासून पावसाने अक्षरश झोडपून काढले. मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांत पावसाची संततधार सुरू आहे. नवी मुंबई, ठाणे, कांजूरमार्ग, पवई परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड परिसरात पावसाची रिमझिम सूरू आहे. मुंबईची 'लाईफलाईन' असलेल्या रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला असून, पश्चिम रेल्वेची वाहतूक तीस मिनिटे उशीराने सुरू आहे. कुर्ला आणि चुनाभट्टी दरम्यान पाणी साठल्यामुळे हार्बरवर सीएसटी ते पनवेल मार्गावरील लोकल वाहतूक मंगळवारी दुपारी बंद करण्यात आली. | ||