| मध्य रेल्वेवर आणखी १०१ एटीएम केंद्रे by AllIsWell on 21 July, 2013 - 02:59 AM | ||
|---|---|---|
AllIsWell | मध्य रेल्वेवर आणखी १०१ एटीएम केंद्रे on 21 July, 2013 - 02:59 AM | |
मुंबई – मध्य रेल्वेने ३८ स्थानकांवर आणखीन १०१ नवीन एटीएम केंद्रे सुरू करण्याचे ठरवले आहे. पुढील अडीच महिन्यांत ही एटीएम केंद्रे सुरू होतील. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमार्फत ही केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या ४० स्थानकांत सध्या १०१ एटीएम केंद्रे आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी व वेळेची मर्यादा लक्षात घेऊन ही केंद्रे कमी पडत आहेत. त्यामुळे एटीएम केंद्राबाहेरही रांगा लागत आहेत. या रांगा कमी होण्यासाठी मध्य रेल्वे आणखीन १०१ एटीएम केंद्रे सुरू करणार आहे. या केंद्रात सर्वाधिक कल्याण स्थानकात नऊ केंद्रे सुरू केली जातील. तर उल्हासनगर सहा, सीएसटी पाच, भायखळा पाच, बदलापूर चार केंद्रे सुरू केली जातील. त्याचबरोबर मशिद बंदर, परळ, दादर, कोपर, मुंब्रा आदी स्थानकातही एटीएम केंद्रे चालवली जाणार आहेत. ही केंद्रे पाच वर्षासाठी असतील. यासाठी निविदा मध्य रेल्वेने मागवल्या असून पुढील अडीच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. | ||