पुणे मेट्रोला हिरवा कंदील by messanger on 01 October, 2013 - 03:59 PM | ||
---|---|---|
messanger | पुणे मेट्रोला हिरवा कंदील on 01 October, 2013 - 03:59 PM | |
पुणे महापालिका क्षेत्रातील मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्याला आज राज्य मंत्रिमंडळाने सुधारित मान्यता दिली. हा प्रकल्प राबवण्यासाठी ' पुणे महानगर रेल कॉर्पोरेशन लि. ' स्थापन करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी अशा दोन टप्प्यांसाठी दहा हजार १८३ कोटी रुपये खर्च येणार असून , यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका २० टक्के वाटा उचलणार आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटसाठी २०२१पर्यंत सहा हजार ९६० कोटी रुपये खर्च येणार आहे. तर वनाझ ते रामवाडी या मार्गासाठी तीन हजार २२३ कोटी रुपये खर्च येईल. केंद्राकडून या प्रकल्पाला निधी मिळावा यासाठी राज्य सरकारने पत्रव्यवहार केलेला आहे. दोन हजार ५९३ कोटी रुपये केंद्राकडून या प्रकल्पासाठी मिळणार आहेत. |