| नागपूरला जाणार्या काही प्रवासी रेल्वेगाड्या रद्द by eabhi200k on 24 July, 2013 - 02:59 AM | ||
|---|---|---|
eabhi200k | नागपूरला जाणार्या काही प्रवासी रेल्वेगाड्या रद्द on 24 July, 2013 - 02:59 AM | |
नाशिक- मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचा मुंबई - नागपूर रेल्वेमार्गावर रूळाखालील स्लिपर आणि खडी वाहून गेल्याने हा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे या मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. रेल्वेची ही सेवा पूर्ववत करण्यासाठी सुमारे चाळीस तास लागणार असल्याने दुसर्या दिवशी रविवारीही प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला होता. मुंबईहून भुसावळकडे जाणारी गीतांजली एक्स्प्रेस तब्बल सात उशिरा धावत होती, तर पावसामुळे हावडा- मुंबई दीड तास आणि हटिया एक्स्प्रेस सुमारे चार तासाने उशिरा धावत होत्या. | ||