| नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची डागडुजी सिडकोकडून by railenquiry on 27 June, 2013 - 04:00 AM | ||
|---|---|---|
railenquiry | नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची डागडुजी सिडकोकडून on 27 June, 2013 - 04:00 AM | |
नवी मुंबईतील १६ रेल्वे स्थानकांची डागडुजी करायची कुणी यावरून गेली अनेक वर्षे वाद सुरू असून सिडकोने आता या स्थानकांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांचे दायित्व सिडकोकडे असताना सिडको या स्थानकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी बेलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांनी उत्स्फूर्त रेल रोको आंदोलन केल्यानंतर सिडकोला आपल्या या मालमत्तेची डागडुजी करण्याची आठवण झाली आहे. | ||