| दोन नवीन रेल्वे सुरू होणार by riteshexpert on 17 July, 2013 - 09:00 PM | ||
|---|---|---|
riteshexpert | दोन नवीन रेल्वे सुरू होणार on 17 July, 2013 - 09:00 PM | |
परभणीः मुंबई-अजनी एक्सप्रेस , नांगलडॅम-नांदेड या दोन रेल्वे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली. अजनी ते मुंबई ही साप्ताहिक एक्सप्रेस सोमवारी ३ वाजून ५० मिनीटांनी लोकमान्य टर्मिनस मुंबईवरून सुटणार आहे. ती औरंगाबाद , जालना , परभणी , पूर्णा , वसमत , हिंगोली , वाशीम , अकोला मार्गे अजनी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून १५ मिनीटांनी पोहचाणार आहे. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी अजनीहून शुक्रवारी दुपारी ४ वाजून १५ मिनीटांनी सुटून शनिवारी रात्री मुंबईला पोहचाणार आहे. नांगलडॅम-नांदेड ही रेल्वे गुरुवारी दुपारी ४.४५ वाजता सुटून आनंदपूर , चंदीगढ , अकोला , हिंगोली , वसमत , पूर्णा मार्गे नांदेडला शुक्रवारी रात्री ११. ४५ वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासाला शनिवारी दु. ११ वाजता निघेल. | ||