| कारशेडचे आरक्षण कायम by puneetmafia on 17 July, 2013 - 04:00 PM | ||
|---|---|---|
puneetmafia | कारशेडचे आरक्षण कायम on 17 July, 2013 - 04:00 PM | |
एमआरटीएस कारशेडचे आरक्षण बदलणे शहराच्या हिताचे नाही. ही कारशेड ओवळा येथील मोनो-मेट्रोच्या कारशेडजवळ स्थलांतरीत करणेही व्यवहार्य नाही. त्यामुळे प्रशासनाने आरक्षण बदलाचा प्रस्ताव मांडला असला , तरी शहराच्या भवितव्याचा विचार करून हे आरक्षण कायम ठेवा , अशी भूमिका खुद्द पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत मांडली. सत्ताधारी शिवसेनेनेही तीच भूमिका घेतल्याने कारशेडचे आरक्षण कायम करण्याचा ठराव संमत झाला. | ||