| आता जनरल रेल्वे तिकीटही एसएमएसवर.........!! by riteshexpert on 24 July, 2013 - 03:59 AM | ||
|---|---|---|
riteshexpert | आता जनरल रेल्वे तिकीटही एसएमएसवर.........!! on 24 July, 2013 - 03:59 AM | |
आरक्षित रेल्वे तिकिटे एसएमएसवर देण्याच्या सुविधेनंतर आता सर्वसाधारण तिकिटेही एसएमएसद्वारे मिळवता येणार आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवरील आरक्षण खिडक्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. रेल्वेने एक जुलैपासून आरक्षित तिकिटे एसएमएसवर उपलब्ध केली आहेत. आरक्षित तिकिटे एसएमएसवर मिळवण्याची सुविधा उपलब्ध केल्यानंतर आता जनरल रेल्वेची तिकिटेही इंटरनेट सुविधा नसलेल्या मोबाइलद्वारे केवळ संक्षिप्त संदेश पाठवून मिळवता यावीत, यासाठी रेल्वेने पावले उचलली आहेत. यासाठी तीन अंकी स्वतंत्र क्रमांक उपलब्ध केला जाणार आहे. या क्रमांकावर केवळ दोन संदेश पाठवून घरबसल्या रेल्वेचे जनरल तिकीटही मिळवता येणार आहे. | ||