| Jammu - Kashmir railway Inauguration by PM Manmohan Singh - जम्मू-काश्मीरचा संपर्क प्रत्येक मोसमात, by irmafia on 03 July, 2013 - 06:00 AM | ||
|---|---|---|
irmafia | Jammu - Kashmir railway Inauguration by PM Manmohan Singh - जम्मू-काश्मीरचा संपर्क प्रत्येक मोसमात, on 03 July, 2013 - 06:00 AM | |
बनिहाल - प्रत्येक मोसमात काश्मीर खोर्याचा संपर्क जम्मू आणि देशाच्या अन्य भागाशी कायम राहणार आहे. बनिहालपासून काजीगुंडदरम्यान 11 कि.मी. लांब अंतराच्या पंजाल रेल्वे बोगदा सुरू झाल्यामुळे हा संपर्क साधला जाणार आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी बोगद्याचे उद्घाटन केले. देशातील सर्वांत मोठा व आशियातील तिसरा सर्वात मोठा बोगदा सुरू झाल्यामुळे बनिहाल आणि काजीगुंडदरम्यान 35 कि.मी. अंतर कमी होऊन ते 18 कि.मी. झाले आहे. प्रवासाचा वेळी कमी होणार आहे. बनिहालचे प्रवासी पावणे दोन तासांत श्रीनगरला पोहोचतील. जवाहर बोगद्याच्या रस्त्याने श्रीनगरला पोहोचण्यासाठी सध्या पाच तास लागतात. बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यास हा बोगदा बंद होत होता. यामुळे वाहतूक ठप्प होत होती. बनिहाल रेल्वे बोगद्यामुळे ही अडचण दूर झाली आहे. या निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सिंग म्हणाले, रेल्वे बोगदा सुरू झाल्यामुळे काश्मीरच्या पर्यटनाला चालना मिळेल. तरुणांना रोजगार मिळेल. संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या, रेल्वेमार्ग सुरू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये नवे पर्वाची सुरुवात झाली आहे. न्यू ऑस्ट्रियन बोगदा पद्धतीने बनवलेल्या पीर पंजाल बोगद्यात रेल्वे रुळाच्या बाजूला तीन मीटर रुंद सिमेंटचा रस्ता तयार केला आहे. अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक किलोमीटरवर केबिन आहे. | ||