| विरार, असुविधांचा प्लॅटफॉर्म- by railgenie on 10 July, 2013 - 12:00 AM | ||
|---|---|---|
railgenie | विरार, असुविधांचा प्लॅटफॉर्म- on 10 July, 2013 - 12:00 AM | |
विरार रेल्वे स्टेशनातील प्लॅटफॉर्म क्रमांक आठची लांबी वाढविण्याचे काम रखडल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास होत असून डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. तर नव्या पादचारी पुलाच्या कामाचे फाउंडेशन झाले असून हे कामही डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल, असा दावा केला जातोय. रेल्वे स्टेशनात भिकारी, निराश्रितांचे आक्रमण झाले असून त्यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच सबवे फेरीवाल्यांना आंदण दिला असून याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. | ||