| क्रूरकर्मा अफझल गुरुला फाशी by railgenie on 09 February, 2013 - 04:00 PM | ||
|---|---|---|
railgenie | क्रूरकर्मा अफझल गुरुला फाशी on 09 February, 2013 - 04:00 PM | |
संसदेवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड, जैश-ए-मोहंम्मदचा खतरनाक अतिरेकी आणि कसाबनंतर देशाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या क्रूरक्रर्मा अफझल गुरूला अखेर १२ वर्षांनी फासावर लटकवण्यात आले आहे. आज सकाळी ८ वाजता दिल्लीतील तिहार जेलमध्ये अफझलला फाशी देण्यात आली. जेलमधील कर्मचाऱ्यांनाही कुणकुण न लागू देता अत्यंत गुप्तपणे अफझलचा खेळ खल्लास करण्यात आला. फाशीनंतर श्रीनगरमध्ये कर्फ्यू लावण्यात आला असून काश्मीरसह देशभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. | ||