| दुसऱ्या मेट्रो रेल्वेत 'धोरणलकव्या'ची आडकाठी ! by nikhilndls on 26 June, 2013 - 11:30 PM | ||
|---|---|---|
nikhilndls | दुसऱ्या मेट्रो रेल्वेत 'धोरणलकव्या'ची आडकाठी ! on 26 June, 2013 - 11:30 PM | |
चारकोप-वांद्रे-मानखुर्द मार्गावर नियोजित असलेल्या दुसऱ्या मेट्रो रेल्वेच्या कारडेपोच्या जागेसाठी पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळत नसल्याने हा प्रकल्प रखडल्याचे वरकरणी दिसत असले तरी या प्रकल्पासमोरील खरे आव्हान आहे ते धोरणात्मक निर्णयाचे. मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात आणि अरुंद रस्त्यांवरून या सुमारे ३२ किलोमीटर लांबीच्या मार्गावर उन्नत मार्गाने मेट्रो बांधणे अशक्यप्राय असल्याने या मार्गावरही भुयारी मेट्रोचा पर्याय पुढे आला होता. पण राज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळे दुसऱ्या मेट्रोचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. | ||