| मध्य रेल्वेवरही 'एलिव्हेटेड कॉरिडॉर'चा आग्रह धरणार CR by Mafia on 23 January, 2013 - 09:00 PM | ||
|---|---|---|
Mafia | मध्य रेल्वेवरही 'एलिव्हेटेड कॉरिडॉर'चा आग्रह धरणार CR on 23 January, 2013 - 09:00 PM | |
मुंबई- मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण या अंतरासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉरची उभारणी केली जावी, यासाठी आपण आगामी रेल्वे अर्थसंकल्पीय चर्चेत जोरदार मागणी करणार आहोत, असे स्पष्ट आश्वासन ठाणे जिल्ह्यातील खासदारांनी आज दिले. "सकाळ'च्या मुंबई आवृत्तीतर्फे बेलापूर येथील सकाळ भवनात आगामी केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी ठाणे जिल्ह्यातील खासदारांना व विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी हे आश्वासन खासदारांनी दिले. | ||