| 'मेट्रो-3'साठी सल्लागार नेमण्याच्या हालचाली सुरू by eabhi200k on 19 June, 2013 - 04:01 PM | ||
|---|---|---|
eabhi200k | 'मेट्रो-3'साठी सल्लागार नेमण्याच्या हालचाली सुरू on 19 June, 2013 - 04:01 PM | |
मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावर संपूर्णपणे भुयारी असणाऱ्या 'मेट्रो-3' प्रकल्पाचे दर्जा नियंत्रण, देखरेख, प्राथमिक संकल्पचित्र तयार करणे, पर्यावरणीय व्यवस्थापन कार्यक्रमाची तयारी करणे, प्रकल्पाची चाचणी करून ती कार्यान्वित करणे आदी कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अखत्यारीतील मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) याविषयी इच्छुक कंपन्यांकडून 17 जुलैपर्यंत "एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट'चे प्रस्ताव मागवले आहेत. | ||