परळ टर्मिनससाठी आणखी पाच वर्षे थांबा by nikhilndls on 15 May, 2012 - 06:00 AM | ||
---|---|---|
nikhilndls | परळ टर्मिनससाठी आणखी पाच वर्षे थांबा on 15 May, 2012 - 06:00 AM | |
मुंबई : मुंबईकडे येणाऱ्या बहुतांश लोकल दादर स्थानकातच रिकाम्या होतात. त्यामुळे या सर्व लोकल छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत न चालवता भविष्यात त्या परळ येथून सोडण्याची मध्य रेल्वेची योजना आहे. मात्र कुर्ला-सीएसटीदरम्यान पाचवा आणि सहावा मार्ग तयार झाल्याशिवाय या योजनेची अंमलबजावणी करणे शक्य नाही आणि या मार्गात भूसंपादन हीच मुख्य अडचण आहे. त्यामुळे हा मार्ग तयार होण्यास किमान पाच ते सहा वर्षे लागतील. त्यामुळे परळ टर्मिनसचे कामही तोवर पूर्ण होऊ शकणार नाही, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. |