Indian Railways News => Topic started by messanger on Jun 17, 2013 - 00:01:45 AM


Title - ‘तत्काळ’साठी साक्षांकित प्रत हवी
Posted by : messanger on Jun 17, 2013 - 00:01:45 AM

नागपूर

तत्काळ तिकीट घेताना मूळ परिचयपत्रासहच त्याची स्वयं साक्षांकित (सेल्फ अटेस्टेड) प्रतही सादर करावी लागणार आहे. १५ जूनपासून मध्य रेल्वेने या नियमाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.

तिकीट काढताना या दोन्ही प्रती काऊंटरवर सादर कराव्या लागणार आहेत. एखादी व्यक्ती दुसऱ्या प्रवाशाचे तत्काळ तिकीट घेण्यास आली असल्यास तिला आरक्षण अर्जासोबत स्वतःचे मूळ परिचय पत्र, त्याची स्वयं साक्षांकित प्रत त्याचप्रमाणे ज्याचे तिकीट काढायचे आहे त्या व्यक्तीचे मूळ ओळखपत्र व त्याची साक्षांकित प्रत देणे आवश्यक आहे. तात्काळ तिकीट घेतानाच्या नियमात झालेल्या या बदलाची सर्व प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.