Indian Railways News => Topic started by railgenie on Jul 29, 2013 - 19:59:25 PM


Title - हार्बर हळूहळू पूर्वपदावर
Posted by : railgenie on Jul 29, 2013 - 19:59:25 PM

मुंबई


हार्बर मार्गावर पनवेलहून सीएसटीकडे जाणा-या एका लोकलमध्ये बिघाड झाल्याने पनवेल-सीएसटी मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. मात्र हा बिघाड दुरुस्त करण्यात आला असून हार्बर मार्गावरील अप वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

पनवेलहून सीएसटीकडे जाणा-या एका लोकलमध्ये १०:५०च्या सुमारास रे-रोड-कॉटनग्रीन स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यामुळे सीएसटीकडे जाणारे चाकरमानी प्रवासी संतापले. लोकलमधील तांत्रिक बिघाड ११:१५च्या सुमारास दूर करण्यात रेल्वेचे कर्मचा-यांना यश आले असून या मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, या मार्गावरील दोन पनवेल आणि दोन वांद्रे लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी दोन पनवेल लोकल आणि एक वांद्रा लोकल वडाळ्याहून सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.