Indian Railways News => Topic started by puneetmafia on Jun 28, 2013 - 18:30:48 PM


Title - सुखरूप परतले ४० यात्रेकरू
Posted by : puneetmafia on Jun 28, 2013 - 18:30:48 PM

नागपूर

चारधाम यात्रेसाठी खापरखेडा व नागपूर येथून गेलेले ४० प्रवासी गुरुवारी सुखरूप परतले . या यात्रेकरूंचे नागपूर रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले .

ओम ट्रव्हल्स व राहुल ट्रव्हल्सने खापरखेडा व नागपूरचे काही प्रवासी १० जूनला हरीद्वारला गेले होते . १६ जूनला गंगोत्रीला जाताना हे प्रवासी पुरात अडकले . त्यामुळे बरकोट येथे सहा दिवस यात्रेकरूंनी एका धर्मशाळेत काढले . त्यानंतर स्वतःचा बचाव करीत हे यात्रेकरून नागपूरकडे रवाना झालेत . मुसळधार पावसापासून व निसर्गाच्या प्रकोपासून वाचण्याकरिता होटेलच्या छताखाली ४ तास उभे राहण्यासाठी त्यांना पाच हजार रुपये मोजावे लागले .

पाण्याच्या बाटलीसाठी ४० रुपये , जेवणासाठी १५० रुपये , चहा २० रुपये अशा दराने त्यांना जीवनावश्यक वस्तूंसाठी पैसे मोजावे लागले . प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचा संतापही यापैकी अनेक यात्रेकरूंनी व्यक्त केला .