Indian Railways News => Topic started by irmafia on May 29, 2012 - 06:00:30 AM


Title - सिग्नल यंत्रणा बिघडली, मध्य रेल्वे रखडली
Posted by : irmafia on May 29, 2012 - 06:00:30 AM

मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी विस्कळीत झाल्यानं अनेक चाकरमान्यांचा आठवडा ' लेट मार्क ' नं सुरू झाला. माटुंगा ते दादर रेल्वे स्टेशनांदरम्यानच्या सिग्नल यंत्रणेत ऐन सकाळी बिघाड झाल्यानं सकाळच्या वेळी धिम्या मार्गावरच्या लोकल १५ मिनिटं उशिरानं धावत होत्या.

ठाणे-कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणा-या स्लो ट्रॅकवरची सिग्नल यंत्रणा सकाळी कोलमडली होती. त्यामुळे धिम्या मार्गावरच्या ट्रेन जलद मार्गावर नेण्यात आल्या. परिणामी, जलद मार्गावरच्या वाहतुकीचा वेगही मंदावला. इतकंच नव्हे तर, करी रोड आणि चिंचपोकळी स्टेशनांवर या ट्रेन थांबू शकत नव्हत्या. त्यामुळे तिथं ट्रेन पकडणा-या आणि या स्टेशनांवर उतरू इच्छिणा-या प्रवाशांची चांगलीच त्रेधा उडाली. पण, मध्य रेल्वेच्या नावानं बोटं मोडत, १५-२० मिनिटं उशिरा ऑफिसला जाण्याशिवाय चाकरमान्यांकडे काहीच पर्याय नव्हता.