Indian Railways News => Topic started by messanger on Jul 04, 2013 - 15:00:15 PM


Title - संत्रानगरीत मेट्रो आणा
Posted by : messanger on Jul 04, 2013 - 15:00:15 PM

नागपूर

संत्रानगरीत मेट्रो आणा ही खासदार विलास मुत्तेमवारांची मागणी लवकर पूर्ण करा , अशी मागणी हैदर अली दोसानी यांनी नगरविकास मंत्री कलमनाथ यांच्याकडे केली . काही दिवसांपूर्वीच हैदर अली यांनी कलमनाथ यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले .

नागपूर देशाच्या मध्यभागी आहे . महाराष्ट्राखेरीज मध्य प्रदेश , आंध्र प्रदेश , छत्तीसगड राज्यांमधील ज ‍ वळपास ४८ जिल्ह्यांशी व्यापारिकदृष्ट्या नागपूरचा संबंध येतो . त्यामुळे येथे विविध घडामोडी घडत असतात . दिवसेंदिवस शहराचा व्याप वाढत आहे . त्यामुळे भविष्यात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे . भविष्याच्या दृष्टिकोनातून शहरात मेट्रो अत्यंत आवश्यक आहे . त्यामुळे नागपुरात मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात यावी , अशी मागणी हतकरघा महामंडळाचे माजी अध्यक्ष हैदर अली यांनी केली आहे .