Indian Railways News => | Topic started by railgenie on Sep 27, 2013 - 14:56:54 PM |
Title - संत्रागाछी-राजकोट विशेष ट्रेनPosted by : railgenie on Sep 27, 2013 - 14:56:54 PM |
|
नागपूर: सणांमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता संत्रागाछी- राजकोट व्हाया नागपूर अशी विशेष गाडी सोडण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाडीचा तपशील असा - ०८०४९ संत्रागाछी- राजकोट ही विशेष गाडी १६, २३ व ३० ऑक्टोबर तसेच १३, २० व २७ नोव्हेंबर रोजी (दर बुधवारी) संत्रागाछीवरून २१.२५ वाजता सुटेल. गुरुवारी १७.५० वाजता ही गाडी नागपूरला पोहचेल व १८.०० वाजता राजकोटसाठी रवाना होईल. |