Indian Railways News => Topic started by puneetmafia on Sep 16, 2013 - 15:00:04 PM


Title - संत्रागाछी-LTT दरम्यान १६ विशेष गाड्या
Posted by : puneetmafia on Sep 16, 2013 - 15:00:04 PM

दिवाळीमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता संत्रागाछी-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीएस) दरम्यान १६ साप्ताहिक विशेष गाड्या नागपूरमार्गे धावणार आहेत.

या गाड्यांचा तपशील असा : ०८०६० संत्रागाछी-एलटीएस ही सुपरफास्ट विशेष गाडी संत्रागछीवरून ९ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या काळात दर बुधवारी (एकूण ८ फेऱ्या) सकाळी ६.०५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) दुपारी १३.३५ वाजता एलटीएस येथे पोहचेल. १० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी ही गाडी नागपूरला ००.०५ वाजता येईल व ००.२५ वाजता पुढील प्रवासाला रवाना होईल.

०८०५० एलटीएस- संत्रागाछी ही सुपरफास्ट विशेष गाडी एलटीएसवरून ११ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर या काळात दर शुक्रवारी (एकूण ८ फेऱ्या) मध्यरात्री ००.४५ वाजता सुटेल व शनिवारी सकाळी ८ वाजता संत्रागाछी येथे पोहचेल. ११ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी ही गाडी नागपूरला १३.५० वाजता येईल व १४.०० वाजता पुढील प्रवासाला रवाना होईल.

या गाडीला खडकपूर , टाटानगर , चक्रधरपूर , राऊरकेला , झारसागुडा , बिलासपूर , रायपूर , दुर्ग , गोंदिया , नागपूर , वर्धा , बडनेरा , अकोला , भुसावळ , मनमाड , नाशिक , इगतपुरी , कल्याण या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाडीत एकूण १५ कोच आहेत. यात २ पॉवर कार , १ फर्स्ट एसी , १ वातानुकूलित पॅन्ट्री कार , १ द्वितीय वातानुकूलित , ७ तृतीय वातानुकूलित कोच आहेत. प्रवाशांनी या विशेष गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.