Indian Railways News => Topic started by Jitendar on Jul 03, 2013 - 18:05:59 PM


Title - शटल रेल्वे पाच दिवस चालणार
Posted by : Jitendar on Jul 03, 2013 - 18:05:59 PM

औरंगाबाद

नगरसोल ते करंजगावदरम्यान रेल्वे रूळ बदलण्याचे काम सध्या सुरू आहे . यामुळे धर्माबाद - मनमाड - धर्माबाद एक्स्प्रेसला दोन तास थांबविण्यात येत होते . त्यामुळे धर्माबाद - मनमाड रेल्वे दोन जुलैपासून धर्माबाद ते औरंगाबाद अशी धावणार आहे ; शिवाय शटल रेल्वेही रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

नगरसोल ते करंजगाव स्टेशनमध्ये रेल्वे रूळ बदल्याचे काम सुरू करण्यात आले आहे . त्यामुळे येत्या दोन महिन्यांसाठी काही रेल्वेंना थांबवून पाठविण्यात येत होते . सध्या या भागात पीक्यूआरएस मशिनीद्वारे काम सुरू आहे . हे काम करत असताना , धर्माबाद ते मनमाड अशा चालणाऱ्या रेल्वेला मनमाड ते औरंगाबाद मार्गात दोन तास थांबविण्यात येत होते ; मात्र दोन जुलैपासून धर्माबाद ते मनमाड ही रेल्वे औरंगाबाद रेल्वे स्थानकावर थांबविली जाईल . ही रेल्वे पुढील दोन महिने धर्माबाद ते औरंगाबादपर्यंतच चालणार आहे .

याशिवाय जालना नगरसोल शटल रेल्वे ही दर शनिवारी बंद असते , मात्र आगामी दोन महिन्यांसाठी आठवड्याच्या रविवारीही शटल सेवा बंद राहणार आहे . आठवड्यातील पाच दिवस ही सेवा सुरू राहील ; मात्र रविवार आणि शनिवार दोन महिन्यांसाठी सेवा बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली .