Indian Railways News => Topic started by eabhi200k on Jul 30, 2013 - 03:00:21 AM


Title - लोको पायलटचाच मृत्यू - नागपूर
Posted by : eabhi200k on Jul 30, 2013 - 03:00:21 AM

नागपूर, म.टा.प्रतिनिधी

प्रकृती बिघडलेल्या सहका-याला उपचारासाठी नागपुरात आणताना लोको पायलटचा (रेल्वे चालक) रविवारी मृत्यू झाला. प्रकाश बोडखे (वय ४२ , नरेंद्रनगर) असे मृतकाचे नाव आहे. बोडखे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत लोको पायलट , तर संजय भगत हे सहायक पायलट आहेत. दोघेही आज सकाळी ६ वाजता कामावर हजर झाले. त्यानंतर मेटपांजरा येथे लाइट इंजिन घेऊन ते निघाले. मार्गात भगत यांनी आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. त्यामुळे भगत यांना घेऊन बोडखे २२१११ भुसावळ-खंडवा एक्स्प्रेसने नागपूरकडे निघाले. मात्र , त्यावेळी बोडखे यांच्याही छातीत दुखत होते. काही दूर गेल्यावर त्यांना उलटी झाली व ते बेशुद्ध पडले. भगत यांनी अधिकारी तसेच रेल्वे इस्पितळात याबाबत कळविले. गाडी नागपूरला येताच बोडखे यांना रेल्वे इस्पितळात नेण्यात आले. मात्र , तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान , या घटनेमुळे रेल्वे प्रशासन वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.