Indian Railways News => Topic started by AllIsWell on Mar 07, 2013 - 09:00:27 AM


Title - लातूर-नांदेड जिल्हे जवळ येणार -औरंगाबाद + मराठवाडा -महाराष्ट्र-Maharashtra Times
Posted by : AllIsWell on Mar 07, 2013 - 09:00:27 AM

लातूर-नांदेड जिल्हे जवळ येणार Mar 6, 2013, 01.00AM IST   आर्टिकल प्रतिक्रिया (7)

7

एक्स्प्रेसच्या मार्गवाढीवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

म . टा . प्रतिनिधी , नांदेड

लातूर - मुंबई ही रेल्वे गाडी आता नांदेडहून सुटणार असल्याने नांदेड - लातूरचे अंतर वाढणार नसून , हे दोन्ही जिल्हे अधिक जवळ येणार आहेत , अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे . खासदार भास्करराव पाटील खतगावकरांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे .

लातूर - मुंबई नांदेडहून सुटणे , हे मराठवाड्यातील प्रवाशांच्या दृष्टीकोनातून सोयीचेच असल्याचे सांगत अशोक चव्हाण म्हणाले , ' कोणतीही रेल्वे अंतिमत : प्रवाशांच्या सोयीसाठी असतात . नांदेडहून मुंबईला जाणाऱ्या नंदिग्राम आणि देवगिरी एक्स्प्रेस नागपूर आणि सिकंदराबाद येथून सुटायला लागल्यानंतर , त्याची आम्ही तक्रा केली नाही . नांदेडची विमानसेवाही लातूरमार्गे होती , त्याबद्दलही आमची काही तक्रार नव्हती . ही गाडी नांदेडहूनच भरून येईल , अशी भीती प्रवाशांना वाटत असेल , तर लातूर - उस्मानाबादचा कोटा वाढवत गाडीचे डबे वाढविण्यासाठी माझा प्रयत्न असेल . शेवटी या गाडीमुळे नांदेड व लातूर ही शहरे जवळच येणार आहेत .'

या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर , खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी या घोषणेचे श्रेय घेतले होते . त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे . ही गाडी नांदेडहून सोडताना , नांदेडच्या प्रवाशांसाठी जादा सहा डबे लावावेत आणि उर्वरित गाडी ण्याची मागणी केली आहे . त्यामुळे लातूर - उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रवाशासाठी रिझर्व्ह ठेवावी , अशी मागणी केली आहे , याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे .