Indian Railways News => Topic started by greatindian on Jul 03, 2013 - 18:04:26 PM


Title - रेल्वेस्थानकाबाहेरील मोठाले रस्ते खड्ड्यात
Posted by : greatindian on Jul 03, 2013 - 18:04:26 PM

नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून अनेक दिवसांपासून या खड्डयांमुळे अपघात होत आहेत . याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत . हा खड्डा तातडीने बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .

नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या बाहेर अनेक दिवसांपासून मोठे खड्डे पडले असून या खड्डयांमुळे अनेकवेळा अपघात घडले आहेत . नाशिकरोड रेल्वे स्थानकात नेहमीच विविध भागातून पर्यटक येत असतात त्यांना रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडताच या खड्डयातून प्रवास करावा लागत आहे . रेल्वेस्थानकाच्या बाजुला बसस्थानक असल्याने हा भाग वर्दळीचा आहे या स्थानकातून नाशिक , नाशिकरोड भागातील विविध ठिकाणी नागरिक प्रवास करीत असतात या स्थानकातूनच एसटीची प्रवाशी वाहतुक होत असते तेव्हा या खड्डयांचा त्रास बस प्रवाशांनाही करावा लागतो . या खड्डयांमुळे गाड्यांचे पार्ट निकामी झाल्याने अनेकवेळा वाहनांची दुरुस्ती करावी लागत असल्याचे टॅक्सीचालकांचे म्हणणे आहे . या खड्डयांमध्ये अनेक वेळा रिक्षा पडल्या आहेत . यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .