Indian Railways News => Topic started by eabhi200k on Jul 18, 2013 - 00:00:45 AM


Title - रेल्वेस्टेशन रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा
Posted by : eabhi200k on Jul 18, 2013 - 00:00:45 AM

औरंगाबाद

रेल्वेस्टेशन ते क्रांतीचौक या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा, असे आदेश खासदार चंद्रकांत खैरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले. मंगळवारी त्यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेले भूसंपादन लवकर करा असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. रस्त्याच्या संदर्भात उद्या बुधवारी खैरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

रेल्वेस्टेशन ते क्रांतीचौक या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडले आहे. हे काम सुरू व्हावे यासाठी नगरसेवक विजय वाघचौरे यांनी पालिका प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन गेल्या आठवड्यात महापौर कला ओझा यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली होती. रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी पालिका अधिकारी व रस्त्याच्या कामाचे ठेकेदार यांना दिले होते. महापौरांनी आदेश दिल्यावरही रस्त्याचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे आज मंगळवारी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या रस्त्याच्या कामाला भेट दिली. यावेळी महापौर कला ओझा, सभागृहनेता सुशिल खेडकर, माजी सभापती विकास जैन, नगरसेवक विजय वाघचौरे, पालिकेचे कार्यकारी अभियंता सखाराम पानझडे, उपअभियंता के.आर. कुलकर्णी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. रस्त्याच्या कामात भूसंपादनाचा अडथळा असल्याचे लक्षात आल्यावर आवश्यक ते भूसंपादन लकर करा असे आदेश खैरे यांनी दिले. ' भूसंपादनाची प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत रस्त्याचा जो भाग पालिकेच्या ताब्यात आहे, त्यावर काम सुरू करा, ' असे आदेश खैरे यांनी दिले.