Indian Railways News => Topic started by RailXpert on Jun 16, 2013 - 19:30:15 PM


Title - रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा
Posted by : RailXpert on Jun 16, 2013 - 19:30:15 PM

नवी दिल्ली

आगामी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी काँग्रेसने अजय माकन आणि सी पी जोशी या दोन केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. मनमोहन सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री असलेल्या अजय माकन यांनी काल (शनिवारी) आणि रेल्वेमंत्री सी. पी. जोशी यांनी आज (रविवारी) राजीनामा दिला. हे दोन्ही नेते आता दिल्ली काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या जबाबदा-या स्वीकारणार असल्याचे समजते.

माकन यांना दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष किंवा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस केले जाण्याची शक्यता आहे. ४९ वर्षाचे माकन यांना आधी गृहराज्यमंत्री करण्यात आले होते . त्यानंतर त्यांना क्रीडा व युवा खात्याचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये माकन यांना कॅबिनेट मंत्रिपदावर बढती देण्यात आली होती. काही विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार माकन यांना दिल्लीचे मुख्यमंत्रीही केले जाण्याची शक्यता आहे.