Indian Railways News => Topic started by irmafia on Jun 25, 2013 - 03:00:39 AM


Title - रेल्वेत धूम्रपान करणारे पकडले
Posted by : irmafia on Jun 25, 2013 - 03:00:39 AM

नागपूर :
रेल्वेत धूम्रपान करणाऱ्या ३३ जणांना पकडून आरपीएफने त्यांच्याकडून दंड वसूल केला . दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील सुरक्षा आयुक्त डी . बी . गौर यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफने अनधिकृत व्हेंडर , धूम्रपान करणारे , तृतीयपंथी , विनातिकीट प्रवास करणारे , रेल्वे फाटकावर नियमांचे उल्लंघन करणारे यांच्याविरुद्ध धडक मोहीम राबविली . यात १७ अनधिकृत व्हेंडर्स , २७ ट्रेस पासर्स , ३३ धूम्रपान करणारे व ४६५ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले . रेल्वे फाटकावर नियमांचे उल्लंघन करणारे ५ जण आरपीएफच्या जाळ्यात अडकले . या सर्वांकडून एकूण १ लाख ४२ हजार २३५ रु . दंड वसूल करण्यात आला .
धावत्या गाडीत प्रवाशांच्या सामानाची चोरी , तिकीट दलाली , रेल्वे साहित्याची चोरी हे प्रकार थांबविण्यासाठी दपूमरेने विशेष टास्क फोर्स स्थापन केला आहे .