Indian Railways News => Topic started by eabhi200k on Oct 08, 2013 - 15:00:09 PM


Title - रेल्वेच्या तिकिटासाठी मोजले जादा भाडे
Posted by : eabhi200k on Oct 08, 2013 - 15:00:09 PM

औरंगाबाद: औरंगाबाद ते मुंबई आणि औरंगाबाद ते दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांसह इतर रेल्वेतून जाणाऱ्या अनेक प्रवाशांना वाढलेल्या तिकिट दराचे भाडे , रेल्वे तिकिट तपासणी अधिकाऱ्यांकडे भरावे लागले. जनशताब्दी वगळता इतर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या या रेल्वे प्रवाशांना अचानक प्रवासादरम्यान भाडेवाढीचा फटका सहन करावा लागला. औरंगाबाद ते मुंबई आणि औरंगाबाद ते दिल्ली या मार्गासाठी दहा ते तीस रुपयाचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागला.

रेल्वे विभागाने अचानक रविवारी मध्य रात्रीपासून रेल्वेच्या प्रवास दरात दोन टक्क्यांची वाढ केली. सचखंड एक्सप्रेसने औरंगाबाद ते दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रत्ये‌क तिकिटाच्या मागे दहा ते तीस रूपये अतिरिक्त पैसे प्रवासादरम्यान भरावे लागले. याशिवाय दररोज नियमित प्रवास करणाऱ्यांच्या तिकिटामध्ये ३० रुपयांवरील तिकिटावर एक रूपया वाढीने तिकिट घ्यावे लागले आहे. रेल्वेचे दर दोन टक्क्याने वाढविण्यात आले आहे. जुन्या दरात तिकिट घेऊन सोमवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पैसे वसूल करण्यासाठी रेल्वे स्थानकावर विशेष तिकिट तपासणी अधिकारी किंवा पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात येत होती. याशिवाय , प्रवासादरम्यान प्रवाशांकडून तिकिट तपासणी अधिकारी यांनी वाढीव दराप्रमाणे तिकिटावरील वाढीव पैसे वसूल करून त्यांना पावती देण्यात येत असल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागाचे वाणिज्यिक विभागाचे चार्ल्स हेरेंज यांनी दिली.

श्रेणी आताचे दर पूर्वीचे दर

औरंगाबाद ते दिल्ली-सेकंड एसी १९७० १९५०
थर्ड एसी १३६५ १३४०
स्लीपर ५२५ ५१५
औरंगाबाद ते हैदराबाद-स्लीपर २५५ २५०
थर्ड एसी ७०५ ६९१
सेकंड एसी १०१० ९९०
औरंगाबाद ते तिरुपती-स्लीपर ४६० ४५०
सेकंड एसी १२३० १२१०
औरंगाबाद ते अजमेर-स्लीपर ४९० ४८०
थर्ड एसी १३०० १२७४
सेकंड एसी १९०५ १८६६
औरंगाबाद ते मुंबई-स्लीपर २०५ २००
थर्ड एसी ५४६ ५३५
सेकंड एसी ७१९ ७०५
याशिवाय नियमित भाड्यातसुद्धा वाढ करण्यात आली आहे. जनरलसह अन्य तिकिटांमध्ये वाढ करण्यात आले आहे.