Indian Railways News => | Topic started by irmafia on Oct 08, 2013 - 14:58:41 PM |
Title - रेल्वेच्या तिकिटासाठी मोजले जादा भाडेPosted by : irmafia on Oct 08, 2013 - 14:58:41 PM |
|
औरंगाबाद: औरंगाबाद ते मुंबई आणि औरंगाबाद ते दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांसह इतर रेल्वेतून जाणाऱ्या अनेक प्रवाशांना वाढलेल्या तिकिट दराचे भाडे , रेल्वे तिकिट तपासणी अधिकाऱ्यांकडे भरावे लागले. जनशताब्दी वगळता इतर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या या रेल्वे प्रवाशांना अचानक प्रवासादरम्यान भाडेवाढीचा फटका सहन करावा लागला. औरंगाबाद ते मुंबई आणि औरंगाबाद ते दिल्ली या मार्गासाठी दहा ते तीस रुपयाचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागला. |