Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 03, 2013 - 18:03:00 PM


Title - रेल्वेचे वेळापत्रक बदलल्याने प्रवाशांचे हाल
Posted by : nikhilndls on Jul 03, 2013 - 18:03:00 PM

वैजापूर

नगरसोल - नांदेड पॅसेंजरची रोटेगाव रेल्वेस्थानकावरुन निघण्याची सकाळी आठ वाजता होती . ही वेळ बदलून सहा करण्यात आल्यामुळे औरंगाबादकडे जाणाऱ्या प्रवासी वैतागले आहेत . नियमित प्रवास करीत असलेले प्रवासी दोन तास अगोदर औरंगाबादला पोहचत असल्याने त्यांची गैरसोय होत असून रेल्वे प्रशासनाने गाडीची वेळ पूर्ववत ठेवावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे .

रेल्वेच्या वेळेबाबत युवा सेनेचे ज्ञानेश्वर पाटील कवडे , प्रशांत शिंदे , विठ्ठल डमाळे , गणेश पहाडी , विजय राजपूत , मधुकर मतसागर यांनी सोमवारी वैजापूरचे आमदार आर . एम . वाणी यांची भेट घेतली . नगरसोल - नांदेड पॅसेंजरने रोटेगाव , करंजगाव , लासूर , पोटूळ येथून दररोज जवळपास तीन हजार प्रवासी औरंगाबादला जातात . यात विद्यार्थी , व्यापारी , शिक्षकांचा समावेश आहे . यापूर्वी नगरसोल - नांदेड पॅसेंजरची वेळ सकाळी आठ असल्याने सगळ्यांना सोयीची होती . पण दोन जुलैपासून गाडीची वेळ सकाळी सहा करण्यात आली आहे . त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेने दिला आहे . जालना - नगरसोल व हैद्राबाद पॅसेंजर मनमाडपर्यंत नेण्याची मागणीही करण्यात आली आहे . दरम्यान , आमदार वाणी यांनी रेल्वे प्रश्नाबाबत खासदार चंद्रकांत खैरे यांना पत्र लिहून लक्ष देण्याची विनंती केली आहे .