Indian Railways News => Topic started by riteshexpert on May 30, 2012 - 08:00:17 AM


Title - रेल्वेचा बुधवारी मेगा ब्लॉक
Posted by : riteshexpert on May 30, 2012 - 08:00:17 AM

पुणे-मुंबईसह पुणे-लोणावळादरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येत्या बुधवारी (३० मे) प्रवासाची वेळ बदलावी लागण्याची शक्यता आहे. मळवली ते कामशेतदरम्यान रेल्वे प्रशासनातर्फे 'मेगा ब्लॉक' करण्यात येणार असल्याने लोकलसह काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला आहे.

कामशेत ते मळवलीदरम्यानच्या जुन्या पुलांच्या दुरुस्तीचे काम तातडीने करावे लागणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांपासून दुपारी दोन वाजून ४० मिनिटांपर्यंत हा 'ब्लॉक' असेल. त्यामुळे, बुधवारी धावणारी पुणे-कर्जत पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. मुंबईहून येणारी डेक्कन एक्स्प्रेस आणि मनमाड-पुणे एक्स्प्रेस लोणावळ्यापर्यंतच धावणार असून, या गाड्या तिथूनच पुन्हा रवाना होतील. मुंबई-बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेसच्या वेळातही बदल करण्यात आला असून, मुंबईहून सकाळी आठ वाजून पाच मिनिटांऐवजी ही गाडी दुपारी १२ वाजून पाच मिनिटांनी सुटेल. कोयना एक्स्प्रेसही तिच्या नेहमीच्या वेळेऐेवजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी मुंबईहून सुटेल.

सकाळी नऊपासून दुपारी एकपर्यंतच्या लोणावळ्याला जाणाऱ्या सर्व लोकल तळेगावपर्यंतच धावतील. तसेच, सकाळी साडेनऊपासून दुपारी तीनपर्यंतच्या सर्व लोकल लोणावळ्याऐवजी तळेगावहून पुण्याला येतील. हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस, चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस आणि कोइमतूर-लोकमान्य टिळक टमिर्नस एक्स्प्रेस या सर्व गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा चार तास उशिराने धावतील, असेही रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.